पूरनियंत्रणासाठी धरणे बांधणे आवश्यक – दि.म. मोरे

Construction of dams required for flood control – D.M. More

जलपरिषदेत काही उपाययोजनांवर तांत्रिक उहापोह

चिपळूण : चिपळूण शहरातील गाळ काढण्याचे काम हे अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे परंतु या हे काम आता सातत्याने करावे लागणार आहे याशिवाय जर या शहराला पुरापासून वाचवायचे असेल तर धरणे बांधणे आवश्यक आहे असे मत प्रसिद्ध जलसिंचन तज्ञ दि.म. मोरे यांनी व्यक्त केले. हेल्प फाउंडेशन चिपळूण या संस्थेने आयोजित केलेल्या आई केल्या कार्यक्रमात त्यांनी बोलताना काही उपाययोजनांच्या बाबत सूचना केल्या.

राज्याचे माजी सिंचन सचिव यांनी चिपळूणमध्ये वाशिष्टी व शिव नदीची पाहणी केली व त्यानंतर जल परिषदेला प्रमुख वक्ते म्हणून बोलताना त्यांनी गाळ काढण्याच्या प्रक्रियेचे समर्थन केलेच पण यावेळी ते म्हणाले की हा विषय आता देखभाली अंतर्गत सातत्याने करावा लागेल याशिवाय शहराला पुराच्या धोक्यापासून वाचवायचे असेल तर दरवाजे असलेली धरणे बांधणे अत्यंत आवश्यक आहे व या धरणाचा निम्मा उपयोग हा पूर्ण नियंत्रणासाठीच केला पाहिजे जेव्हा पाऊस थांबेल त्या दरम्यानच्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने हळूहळू पाण्याचा विसर्ग करायला हवा. चिपळूणात खूप पाऊस पडतो व मध्येच थांबतो पुन्हा तो परत पडतो व थांबतो या पावसाच्या वागणुकीच्या अभ्यास करणे आवश्यक आहे व त्यानुसार पुढील उपाययोजनेही ठरवली पाहिजे. नदीतील अडथळे दूर करणे हा भाग महत्त्वाचा आहे परंतु त्याचबरोबर एकूणच विचार करून नदीच्या अभ्यासासाठी समिती ही नेमणे अपेक्षित आहे.

येथील डीबीजे कॉलेजच्या सेमीनार हॉलमध्ये जलपरिषद आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी हेल्प फौंडेशनचे अध्यक्ष सतीश कदम यांनी या जलपरिषदेच्या आयोजनाचा उद्देश व भूमिका स्पष्ट केली. तसेच यावेळी त्यांनी फाउंडेशनच्या कामाची ही माहिती उपस्थित त्यांना दिली त्यांच्या हस्ते सर्व उपस्थित सन्माननीय करून पाहुण्यांचा सत्कार झाला या कार्यक्रमाला सिंचन सचिव दि.म. मोरे प्रसिद्ध आर्किटेक्ट सारंग यादवाडकर तसेच प्रतिथयश वकील असीम सरोदे व माजी आमदार सदानंद चव्हाण उपस्थित होते. आमदार सदानंद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी फाउंडेशनचे सदस्य आशिष जोगळेकर यांनी पूरनुकसान भरपाई बाबत केलेल्या याचिकेबाबतची माहितीही दिली.

*गोवळकोट खाडीचे बॉटल नेक काढणे आवश्यक* – यादवाडकर

यावेळी बोलताना प्रसिद्ध आर्किटेक्ट सारंग यादवाडकर यांनी पीपीटी द्वारे चिपळूण शहराचा गुगल मॅप उपस्थितनासमोर सादर करत सविस्तर तांत्रिक माहिती दिली. सारंग यादवाडकर यांनी यावेळी स्पष्टपणे सुचवले की, गोवळकोट जवळील कालुस्ते व मजरेकाशी च्या मधला खाडीतील बॉटल नेक काढणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय पाण्याचा निचरा वेगाने होणारच नाही .कारण याच ठिकाणी पाण्याचा वेग मंदावलेला आहे. चिपळूण शहराचे पाणी दऱ्याखोऱ्यातून आणि इतर भागातून येते ते येतानाच प्रचंड वेगात असते, परंतु शहराच्या ठिकाणी आल्यानंतर ते शांतपणे वाहत असते.अर्थात त्याची व्हेलॉसिटी कमी होते जेव्हा व्हेलोसिटी कमी होते त्यावेळी पाणी हे जागा शोधते आणि ही जागा शोधणे म्हणजेच पूर येणे आहे. यासाठी *गाळ काढण्याची प्रक्रिया ही निरंतर देखभाली अंतर्गत करणे आवश्यक आहे व ती सातत्याने करणे गरजेचे आहे.* चिपळूणच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याने या संपूर्ण नदीच्या काठाचा शासनाने एक विशेष समिती नेमून अभ्यास करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये नागरिकांच्या मागणीनुसार ब्लू लाईन व रेड लाईन याबाबतचे धोरण ठरवता येईल. मात्र लाईन रेड लाईन रद्द होईल असे मला वाटत नाही,पण नदीचा हायड्रो स्टडी केल्यास कमी करुन घेण्यासाठी शासनाने याबाबत धोरण ठरवताना पाठपुरावा करता येईलअसेही यादवाडकर यांनी सूचवले. या दोन्ही रेषा मारताना नागरिकांकडून सूचना मागवण्याची कायद्यात तरतूद नसल्याचेही एका प्रश्नाला उत्तर देताना यादव वाडकर यांनी स्पष्ट केले

*नदीकाठ बांधू नये*

यावेळी बोलताना त्यांनी एक स्पष्ट सूचना केली की, नदी सुधारणा कार्यक्रमांतर्गत नदीकाठ बांधण्याचा विषय आग्रह धरू नये. कारण त्यामुळे नदीचे पात्र प्रचंड संकुचित होते व त्याचा मोठा धोका भविष्यात निर्माण तयार होईल. पुण्यामध्ये हीच उपस्थिती तयार झाली आहे व या गंभीर परिस्थितीमुळे पुण्यामध्ये केव्हाही भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पुराचे सावट आहे.त्यामुळे नदीतला गाळ काढणे,नदीचे पात्र रुंद करणे, नदीमध्ये अडथळे दूर करणे अशा प्रकारच्या उपाययोजना ह्या महत्त्वाच्या ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी पर्यावरणाचे व नदी संदर्भातल्या कायद्यांची माहिती देताना प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी स्पष्ट केले की, नागरिकांनी आता अशा कायदांबाबत जागरूक होणे आवश्यक आहे व जनमताचा दबाव तयार करणे ही आवश्यक आहे. ठोस धोरण नागरिकांनी तयार केले पाहिजे. न्यायालय व आपल्याला न्याय देणाऱ्या संस्था ही पर्यावरणाबाबत जागरूक असल्या पाहिजेत असे आपले मत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणातून माजीआमदार सदानंद चव्हाण यांनी, तज्ञांनी व्यक्त केलेला मताशी आपली सहमती दाखवत याबाबत आपण शासनाकडे आपण सुचवलेल्या उपायांबाबत निश्चितच पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले. नदीला येणारा पूर रोखण्यासाठी धरण आवश्यक असल्याच्या मताशी आपण सहमत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अशा प्रकारच्या चर्चा करण्यासाठी फाउंडेशनने जो पुढाकार घेतला आहे, तो कौतुकास्पद असल्याचे नमूद करतानाच यापुढेही आपले अशा उपक्रमांना आपले सहकार्य असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष अंजली कदम, सदस्य दीपक शिंदे तसेच तसेच नोडल ऑफिसर श्री.खोत, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, राजू भागवत, सफागोटे, आदीती देशपांडे,धनू जोशी, रसिका देवळेकर,रविना गुजर, वकील जीवन रेळेकर सामाजिक कार्यकर्ते फैयाज देसाई,सज्जाद कादरी,इब्राहीम दलवाई, धनश्री जोशी,उद्योजक गजेंद्र कदम, डॉ. विखारे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विनायक बांद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री सतीश कदम यांनी केले.