कातळगाव काव्य संग्रहाचे प्रकाशन

रत्नागिरी : प्रा. सचिन सनगरे लिखित, कातळगाव या काव्य संग्रहाचे प्रकाशन स्वरूपानंद नगर तिवंडेवाडी येथील गाव कार्यांच्या उपस्थित पार पडले. जिल्हा व राज्य स्तरावर पारितोषिक प्राप्त कवितांचा या काव्य संग्रहात समावेश असून प्रामुख्याने देश, राजकारण , व वंचित समूहातील घटकांचे प्रतिनिधित्व करणारा हा काव्य संग्रह आहे. समस्त देशभक्त , प्रामाणिक राजकीय कार्यकर्ते, वंचित समूहाचा आवाज या काव्य संग्रहास आहे. समाजशास्त्र विषय लोकांपर्यंत पोहचविण्याचे खरे काम ते करीत आहेत असे मत कवी उमेश मोहिते यांनी मांडले.

या प्रसंगी समस्त तिवंडेवाडी, शिरगाव येथील ग्रामस्थ, प्रा. शुकराव पोटे, प्रा. विनायक गावडे , मानस प्रिंटर्स चे मालक व कवी उमेश मोहिते, ग्रामपंचायत शिरगाव च्या माजी सदस्या कल्पना भोसले, सौ. स्मिता सनगरे, श्री. तळेकर, श्री. संतोष मोहिते, श्री. सौ. भवतुले, श्री. सौ. संजय सनगरे, काव्यधारा रत्नागिरीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. रत्नागिरीतील अनेक नामांकित लेखक कवी तसेच प्राध्यापक सहकाऱ्यांनी प्रा. सचिन सनगरे यांच्या कातळगाव काव्य संग्रहास शुभेच्छा दिल्या. ग्राम पूजा व हळदी कुंकू समारंभ निमित्त कार्यक्रमात प्रा. सनगरे यांनी कातळगाव ही कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सर्व ग्रामस्थ व उपस्थितांनी काव्य संग्रहास व प्रा. सनगरे यांना शुभेच्छा दिल्या.