नाणिज बस थांबा येथील भुयारी मार्गाचा प्रश्न सुटल्याने आंदोलन मागे

नाणीज चोरवणे शिरंबवलीच्या लढ्याला यश

ग्रामस्थांनी मानले  खा. नारायण राणे यांच्यासह पालकमंत्री उदय सामंत, आ. निलेश राणे, आ. किरण सामंत यांचे आभार

रत्नागिरी | प्रतिनिधी : 

मि-या – नागपूर महामार्गावरील नाणीज बस थांबा येथे भुयारी मार्ग बांधून देण्यात यावा अशी मागणी नाणीज चोरवणे शिरंबवली नांदिवलीच्या ग्रामस्थांनी वारंवार करण्यात आली होती. भुयारी मार्ग बांधून देण्यासाठी नाणीज चोरवणे शिरंबवली च्या ग्रामस्थांनी 26 जानेवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरविले होते होते. रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे, कुडाळचे आमदार निलेश राणे व आ. किरण सामंत यांच्या सहयोगाने मार्गदर्शनाने राष्ट्रीय महामार्ग कार्यालय यांना या भुयारी मार्ग संदर्भात जनतेच्या मागणी रास्त असल्याचे पटवून देऊन या भुयारी मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. यासाठी आ. राणे यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकले होते. तर खा. राणे यांचीही ग्रामस्थांनी भेट घेतली होती.

तसेच प्रांत अधिकारी जीवन देसाई यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, ठेकेदार यांनी ग्रामस्थांच्या समोर नाणीज बस थांबा येथे भुयारी मार्गाचे काम सुरू केले व लवकरात लवकर भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नाणीज ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी खा. नारायण राणे, आ. निलेश राणे, आ. किरण सामंत व प्रांत अधिकारी जीवन देसाई  यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आलेले रास्ता रोको आंदोलन नाणीज आंदोलन समितीकडून स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले.

खा. नारायण राणे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व उद्योग मंत्री उदय सामंत, आ. निलेश राणे, आ. किरण सामंत, भाजपा जिल्हाअध्यक्ष राजेश सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा रत्नागिरी दक्षिण संजय निवाळकर, प्रांत अधिकारी जीवन देसाई, राष्ट्रीय महामार्गाचे अनिल सिंग, विकास चोप्रा, रवी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, ग्रामपंचायत नाणीज ग्रामपंचायत चोरवणे ग्रुप ग्रामपंचायत शिरंबवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे मिळालेल्या सहकार्याबद्दल नाणिज आंदोलन समितीचे अध्यक्ष वसंत रामा दरडी यांनी मनापासून आभार मानले.