रेवंडी येथे वाळू कामगारांचे खून प्रकरणी मालवण पोलिसांची कारवाई
मालवण | प्रतिनिधी : रेवंडी येथे वाळू कामगार हरिलाल सिंह याचा खून केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील पाच संशयित आरोपींना शनिवारी मालवण न्यायालयात हजर केले असता ३० जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
संशयित तेजस पंढरीनाथ सादये (वय २५), रामचंद्र लक्ष्मण तांडेल (वय २७), भारत जगन्नाथ खवणेकर (वय ३२), बाबाजी गणपत तारी (वय ४५) या चार जणांना पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले होते. तर कीर्तिराज मधुकर चोडणेकर वरची तोंडवळी हा संशयीत शनिवारी सकाळी पोलिस ठाण्यात हजर झाला. या पाचही जणांना न्यायालयात हजर केले असता ३० जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने हे करत आहेत.











