खेडमध्ये २१ गावे, ४८ पाणी टंचाई च्या दृष्ट चक्रात

21 villages in the village, 48 in visible cycle of water scarcity

खेड | प्रतिनिधी : दिवसागणिक उपलब्ध पाण्याचे जलस्त्रोत तळ गाठत असल्याने वाढत्या पाणीटंचाईने ग्रामस्थ अक्षरश: हतबलच झाले आहेत. तालुक्यातील २१ गावे ४८ वाड्यांमध्ये पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य उद्भवले असून ६४८४ ग्रामस्थांची पाण्यासाठी तडफड सुरू आहे.

दिवसागणिक वाढणाऱ्या टंचाईग्रस्त गाव-वाड्यांच्या संख्येने प्रशासनही मेटाकुटीस आले आहे. वाढत्या उष्म्याने नदीपात्रासह विहिरी आटत असल्याने ग्रामस्थांना मैलोन्मैल भटकंती करून जेमतेम मिळणाऱ्या पाण्यावर तहान शमवावी लागत आहे.टंचाईग्रस्त गाव-वाड्यांना नियोजनबद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने नियोजनावर भर दिला असला तरी अपुऱ्या टँकरअभावी तहानलेल्या गाव-
वाड्यांची होरपळ होत आहे. सुकिवली येथील चोरद
नदीपात्रातून एकदिवसाआड पाणीपुरवठा करून
ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात असला तरी जेमतेम मिळणाऱ्या पाण्यावर तहान भागवायची कशी, असा प्रश्न ग्रामस्थांना सतावत आहे.

एप्रिल अखेरीसपर्यंत १२ गावातील ३२ वाड्यांमधील ४४४२ ग्रामस्थ पाण्यासाठी हंबरडा फोडत होते. गेल्या
१३ दिवसात ९ गावे १६ वाड्यांची भर पडली. या ठिकाणचे ६४८४ ग्रामस्थ पाण्यासाठी आक्रोश करत आहेत. यामध्ये मांडवे-कोसमवाडी २०५ ग्रामस्थ, अस्तान–कातकरवाडी १५४, जोरकरवाडी १२१, चाटव-धनगरवाडी ८८, मोरवंडे-पिंपळवाडी
बौद्धवाडी १५१, मोदगेवाडी १९९, मधलीवाडी १४२, सुतारकुंभारचा ३६७, पंडमवाडी २०८, सुकिवली-सोनारवाडी १२० ग्रामस्थ पाण्यासाठी हंबरडा फोडत
आहेत. मोरवंडे येथील सर्वाधिक ६ वाड्यांतील १३५४ ग्रामस्थ पाण्यासाठी व्याकुळ आहेत.

दिवसागणिक टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेणाऱ्या गाव-वाड्यांची संख्या झपाट्याने वाढतच
आहे.