माखजन | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश माखजन येथे इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी करिअर मार्गदर्शन झाले.इयत्ता १० वी नंतर नेमकं पुढे काय करायचं या संभ्रमावस्थेत अनेक मुले व पर्यायाने त्यांचे पालक अडकलेले असतात.१० वी नंतर विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी व आपले ध्येय पक्के असावे यासाठी या करिअर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
मार्गदर्शन करण्यासाठी पेढे परशुराम येथील आर.सी काळे विद्यालयातील निवृत्त शिक्षक ,करिअर मार्गदर्शक श्री भास्कर कदम उपस्थित होते.
भास्कर कदम यांनी सुमारे दोन तास १० वी नंतर च्या विविध वाटा डोळ्यासमोर ठेवत मार्गदर्शन केले.यावेळी अनेक अनुभव सांगत आपण कशाप्रकारे आपलं ध्येय गाठू शकतो याविषयी क्लुप्त्या सांगितल्या.
दरम्यान यावेळी भास्कर कदम यांचे स्वागत मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर यांनी केले.यावेळी पर्यवेक्षक अंबादास घाडगे,अमोल पाटील,ओंकार नामजोशी,सचिन साठे,जगदीश जाधव आदीसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











