माखजन | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे येथील श्री सूर्य नारायण मंदिरात २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान रथसप्तमी उत्सव साजरा केला जाणार आहे.
या निमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये दररोज सकाळी सौर लघुरुद्र होणार आहे तसेच रोज सकाळी ११.३० व सायंकाळी ७ वा.आरती मंत्रपुष्प होणार आहे.तर २ रोजी सायंकाळी ४.३० वाजता कीर्तन,रात्री १० वाजता स्वर साथीचे रंग प्रीतीचे,सादरकर्ते मंदार आपटे व स्वाती आपटे यावेळी निवेदन अनघा मोडक करणार आहेत.३ रोजी सायंकाळी ४ वा कीर्तन,५.३० वाजता हळदी कुंकू,रात्री १० वाजता गोविंद गुणगौरव हा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमात विघ्नेश जोशी,आदित्य ओक,राजाभाऊ शेंबेकर,हेरंब जोगळेकर,श्वेता जोगळेकर,श्रीरंग जोगळेकर आपली कला सादर करणार आहेत.४ रोजी रथसप्तमी दिनी सूर्योदयापासून सुर्यास्ता पर्यंत गायत्री मंत्र जप होणार आहे.सकाळी ७ वाजता पालखी सोहळा,दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद,व रात्री १०.३० वाजता रंगल्या रात्री अशा हा स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम होणार आहे.रात्री १ वाजता लळीताचे कीर्तन होईल.यावेळी कीर्तनकार ह.भ.प अभयबुवा घांग्रेकर यांची कीर्तने होणार आहेत.
रथसप्तमी निमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अशोक पोंक्षे ,सचिव सतीश पोंक्षे यांनी केले आहे.












