आंबोली : आंबोली ग्रामपंचायत नावीन्यपूर्ण उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांचा कला, कौशल्यांना वाव देण्याचे काम सतत करत असते. विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमा अंतर्गत रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात कु. सेहेर सिकंदर सिदलाळे हिला तृतीय क्रमांक झाला. या तिचा यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या स्पर्धेसाठी तिला शाळेचे मुख्याध्यापक श्री मोरे सर, उपशिक्षिका रजिया शेख, केंद्रप्रमुख आंबोली गावडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.तिचा पुढील वाटचालीसाठी आंबोली सरपंच श्रीम पालेकर आणि सर्व पालक आंबोली फणसवाडी यांनी शुभेच्छा दिल्या.












