खेड (प्रतिनिधी) मराठा क्रांती स्वराज्य संघटना खेड तालुका अध्यक्ष व निवृत्त एस. टी कर्मचारी चंद्रकांत लक्ष्मणराव मोरे यांनी निवृती नंतर मिळणाऱ्या ६ महिने मोफत प्रवास पास योजना बाबत आक्षेप घेत १२ महिने आजी माजी एस टी कर्मचारी याना मोफत प्रवास पास मिळावा या मागणीसाठी गेली दोन वर्ष सातत्याने संबधित अधिकाऱ्यांना पाठ पुरावा केला अखेर छेडलेल्या उपोषणा नंतर ९ महिने पास ला मंजुरी मिळाली आहे
या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्षात भेट घेऊन निवेदने दिली मात्र समाधानकारक उत्तर मिळत नाही म्हणून उपोषणाचे हत्यार उपसले. अन्य राज्यात १२ महिने मोफत प्रवास सुविधा मंजूर आहे मात्र राज्यातील आजी माजी कर्मचाऱ्यांना या पासुन वंचित ठेवण्यात आले होते. त्या आधी मंत्रालयापासून आगार व्यवस्थापक तहसील कार्यालय पर्यंत सर्वच संबधिताना नोटीस देत प्रजास्तका दिनी उपोषण सुरू केले. परिणामी वर्षभर मोफत प्रवास सुविधा ऐवजी ९ महिने मोफत प्रवास पास मंजुरी मिळाली असुन हा महाराष्ट्रातील सर्व आजी माजी एस टी कर्मचारी यांचा विजय आहे










