रत्नागिरीतील फाटक प्रशालेचे निवृत्त शिक्षक श्रीकांत काळे यांचे निधन 

रत्नागिरी : प्रतिनिधी :रत्नागिरीतील फाटक हायस्कूल या शाळेचे गणित विषयाचे गाढे अभ्यासक, शिस्तप्रिय, विद्यार्थीप्रिय माजी शिक्षक श्रीकांत काळे यांचे शुक्रवारी पहाटे पुणे येथे दुःखद निधन झाले. काळे सर अनेकांसाठी आदर्श तसेच मार्गदर्शकही होते. फाटक हायस्कूलच्या यशामध्ये काळे सरांचा मोठा वाटा आहे. गणित या विषयावर पक्की पकड, मात्र तो विषय शिकवताना त्याचा विद्यार्थ्याना येऊ यासाठी काळे सरांची धडपड असे. गणिताचा तास असूनही काळे सर शिकवायला येणार म्हणून विद्यार्थी मनापासून वर्गात बसे हे विशेष. उत्कृष्ट बॅडमिंटनपटू म्हणूनही काळे सरांची ओळख आहे.

शहरातील सुप्रसिद्ध संस्कृत शिक्षक दा. गो. जोशी सरांचे काळे सर हे जावई. तसेच आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या प्रसिद्ध सेवानिवृत्त निवेदिका निशा काळे यांचे पती होत.