खेड(प्रतिनिधी)
सीएसएमटी मुंबई. स्थानकासह मस्जिद स्थानकादरम्यान पायाभूत सुविधांच्या कामांसाठी २५ जानेवारीपासून घेण्यात आलेला ‘पॉवरब्लॉक’ ३ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येणार आहे.
२५, २६, २७ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी पॉवरब्लॉक घेण्यात आला. या ब्लॉकमुळे जनशताब्दी एक्स्प्रेस, मंगळूर एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी मुंबई- तेजस एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्यांच्या सेवांवर परिणाम झाला होता.
२ व ३ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे कोणत्याही गाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सोमवारी पॉवरब्लॉक संपुष्टात येणार आहे.










