माखजन l वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या,माखजन इंग्लिश स्कूल येथे अनघा मोडक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
अचानक गेलेली दृष्टी आणि त्यामुळे आयुष्यात आलेल्या मोठ्या संकटाचा सामना करत,मोठ्या दुःखाला सामोरे जात आपला जीवन प्रवास कसा सुरू ठेवला याविषयी अनघा मोडक यांनी विद्यार्थ्यांला सांगितले.जिथे सगळं संपलं असे जाणवत,त्याठिकाणी नव्याने कशी सुरवात करावी,संकटांना धैर्याने कसे सामोरे जावे याविषयी अनघा मोडक यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
अनघा मोडक यांनी आपल्या ओघवत्या भाषा शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी संस्था अध्यक्ष किशोर साठे,उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर,माजी अध्यक्ष दिलीप जोशी,ज्येष्ठ शिक्षिका मानसी कोवळे उपस्थित होत्या.यावेळी अनघा मोडक हिचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन ओंकार नामजोशी यांनी केले.












