खेड (प्रतिनिधी) मुंबई-नालासोपारा येथे वास्तव्यास असलेल्या ५२ वर्षीय प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. सुनील आत्माराम भोसले असे मृत प्रौढाचे नाव आहे.
महामार्गावरून प्रवास करत असताना त्यांना श्वास घेण्याचा त्रास होवू लागल्याने उपचारासाठी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









