
लांजा ( प्रतिनिधी) स्वर्गीय जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव सावंत लांजा तालुका कुक्कुट व्यावसायिक सहकारी संस्थेमार्फत लांजा डाफळेवाडी शाळेत विविध कार्यक्रम पार पडले.
स्वर्गीय जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी आमदार शिवाजीराव सावंत यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा, पाठांतर स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेवून बक्षीसे देण्यात आली तसेच संस्थेमार्फत अत्यंत आकर्षक अशी प्रशस्तीपत्रे देण्यात आली.तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेमार्फत दुपारी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.
याप्रसंगी स्वर्गीय जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव सावंत लांजा तालुका कुक्कुट व्यावसायिक संस्था, लांजा चे अध्यक्ष विवेक सावंत, लांजा एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वंजारे, जेष्ठ समाजसेवक विजय खवळे तसेच शाळा लांजा डाफळेवाडीच्या अध्यक्षा सौ. अनुजा अतेश पांचाळ, उपाध्यक्ष राजेंद्र तुळसणकर, नगरसेविका सौ. दुर्वा प्रसाद भाईशेट्ये, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रसाद भाईशेट्ये, सेवानिवृत्त शिक्षक श्री.बेहरे, किरण बेर्डे, दिगंबर मुळ्ये, अतेश पांचाळ, प्रथमेश पांचाळ, सौ.मेघना दुबळे, सौ.संजीवनी पांचाळ, सौ.पूजा शिगम, सौ.जान्हवी कुंभार ,सौ.मानवी पांचाळ तसेच पदाधिकारी,विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षिका सौ. दिपाली यादव यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा मुख्याध्यापक मनोज रेडिज, पदवीधर शिक्षिका सौ. दीपा मुळ्ये व उपशिक्षिका श्रीम. रुक्मिणी कदम यांनी प्रयत्न केले.











