खेड न प च्या गृहनिर्माण संस्था स्पर्धेसाठी १५ पर्यंत मुदत

खेड (प्रतिनिधी)नगरपरिषदेने जाहीर केलेल्या सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण संस्थेसह आदर्श संकुल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे.
खेड नगरपरिषद, रोटरी क्लब, लायन्स क्लब ऑफ सिटी, जेसीज् क्लब व तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १ मार्च ते २८ फेब्रुवारी २०२६ याकालावधीत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत बहुसंख्येने सहभागी होण्याकरिता तातडीने नाव नोंदणी करावी, असे आवाहन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी केले आहे.