ओवळीतील कार्यक्रमात डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने यांचे गौरवोद्गार, ग्रुपने केले ४० विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप
चिपळूण (प्रतिनिधी):– सामाजिक विकास ग्रुप राबवत असलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी काढले.
या ग्रुपच्यावतीने नुकतेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओवळी क्र. १ मधील ४० विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सामाजिक कार्यकर्ते विनेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक विकास ग्रुप एक पाऊल समाजासाठी, माझा गाव, माझी
चिपळूण जबाबदारी हे मिशन घेऊन पुढे जात आहेत. हे कौतुकास्पद असून त्यांनी आपले कार्य असेच सुरू ठेवावे असे आवाहन केले.
माजी सैनिक संभाजी चव्हाण, सैनिक इकबाल चिपळूणकर, राजेश कोकरे, साद कडवेकर, पत्रकार राजेश जाधव, प्रसाद वनगे, नितीन शिगवण, समीर कदम, सचिन पवार, अनिल पिनगे, सुधीर मोरे, वैभव मोहिते, सुशील कदम, सचिन शिंदे, अजय कडव, विवेक जाधव, कर्नल परवेज मुलानी यांनी दिलेल्या ५ हजार रुपयातून विद्यार्थ्यांची स्वेटरची गरज पूर्ण करण्यात आली आहे. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र महाडिक यांनी पत्राद्वारे सामाजिक विकास ग्रुपकडे या स्वेटरची मागणी केली होती.
कार्यक्रमाला शाळा समितीच्या अध्यक्षा रोशनी शिंदे, उपाध्यक्षा अक्षता होडे, मुख्याध्यापिक प्रतीक्षा मोहिते, उपशिक्षिका स्नेहल शिंदे, पदवीधर शिक्षक शंकर माने, ग्रुपचे मुख्य प्रवृर्तक विनेश मोहिते, दिक्षा शिंदे, अनिता शिंदे सिद्धी शिंदे, निलम शिंदे, ज्योस्ना कदम, सुप्रिया घाणेकर, मुक्ताई मेस्त्री, सलोनी पड्याळ, रशिका मेस्त्री, गौरी शिंदे, जुई शिंदे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक राजेंद्र महाडिक, सूत्रसंचालन सचिन पवार यांनी केले.










