वैजी शाळेचा २४ रोजी अमृत महोत्सव

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शिरळ-वैजी या शाळेला ७५ वर्षे झाल्या निमित्ताने रविवार दि. २४ डिसेंबर रोजी शाळेचा अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न होणार आहे. भारताला १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे २४ डिसेंबर १९४८ ला वैजी येथील सदर शाळेची स्थापना झाली. गेल्या ७५ वर्षात या शाळेने असंख्य विद्यार्थी घडविले असून शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात लौकिक प्राप्त केला आहे. शाळेच्या अमृतमहोत्सवानिमित्त दि. २४ डिसेंबरला भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी पुस्तक दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात होऊन नंतर सत्यनारायणाची पूजा, महाप्रसाद, मान्यवरांचा सत्कार, तसेच विशेष नैपुण्यप्राप्त माजी विद्यार्थ्यांच्या गौरव, महिलांसाठी हळदकुंकू असे कार्यक्रम होणार असून रात्री शाळेच्या विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर कलारत्न ग्रुप, चिपळूण यांचा ऑर्केस्ट्रा आजोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी जि.प. सदस्य सौ. मिनल काणेकर, माजी पं. स. सदस्य सुनील तटकरे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या भव्य कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वानी उपस्थित रहावे, असे आवाहन वैजी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आ