लांजा (प्रतिनिधी) भाजपाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर लांजा खानवली चिंचवाडी बस सेवा सुरू करण्यात आली आहे .
चिंचवाडी एसटी बस सेवा सुरू करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून खानवली चिंचवाडी येथील ग्रामस्थांमधून केली जात होती. या ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत भाजपाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पाठपुरावा पुरावा सुरू केला होता. त्यानुसार लांजा आगारामार्फत लांजा खानवली चिंचवाडी एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या बसचे चिंचवाडी येथे जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजपाचे लांजा तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, तालुका सरचिटणीस विराज हरमले, युवा अध्यक्ष अजय गुरव, जिल्हा कमिटी सदस्य वाघोजी खानविलकर, तालुका उपाध्यक्ष अनंत चौगुले, शक्ति केंद्र प्रमुख प्रथमेश बेंडल, कोट गावचे उपसरपंच रवींद्र नारकर, चिंचवाडी प्रमुख प्रकाश कालकर, सरपंच गणपत मांडवकर, बुथ अध्यक्ष प्रवीण मांडवकर, तसेच प्रदीप मांडवकर, शंकर मांडवकर ,रमेश मांडवकर, विजय मांडवकर, पंढरीनाथ कालकर, संतोष मांडवकर, प्रणाली कालकर ,सुवर्णा मांडवकर ,पूर्वा कालकर, पायल मांडवकर ,श्रद्धा मांडवकर व अन्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.










