8th Reunion of Lal Bahadur Shastri High School Alumni Forum in excitement
मंडणगड | प्रतिनिधी : लाल बहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव येथील माजी विद्यार्थी मंचाचे आठवे स्नेहसंमेलन 13 व 14 मे 2023 या दोन दिवसांचे कालावधीत आयोजीत करण्यात आले होते या निमीत्ताने प्रशालेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन मंचाचे वतीने सहा लाख रुपये खर्च करुन बनविण्यात आलेल्या विद्यार्थी आणि शाळा यांच्या गरजेचे असलेल्या २२×८० फुटाचे भव्य बंदिस्त सभागृह शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री अभंग यांचे हस्ते उद्घाटन करुन शाळेस वेगळी भेट देण्यात आली. सभागृह उद्घाटन सोहळा तसेच माजी विद्यार्थी विद्यार्थीनींचे सुवर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी हे भव्य क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते. सोहळ्यास लाल बहादूर शास्त्री हायस्कूचे माजी मुख्याध्यापक श्री अभंग सौ. अभंग,प्रमुख पाहुणे आर व्ही हिरेमठ, विशेष उपस्थिती डॉ. चंद्रशेखर निमकर ( मुंबई) तसेच मंडणगड तालुका विकास मंडळ या संस्थेचे चिटणीस ॲड. अभिजित गांधी, उद्योजक अजित पाटील, श्री. पाटणकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री हुलगे , माजी मुख्याध्यापक श्री अनंत गायकवाड यांची उपस्थित लाभली माजी विद्यार्थी- विद्यार्थ्यांनींच्या सुवर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन श्री अभंग यांनी श्री पाटणकर , अभिजीत गांधी,मंच अध्यक्ष सुभाष तांबे यांचे समवेत करण्यात आले. यामध्ये सोळा संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना प्रथम विजेता ब्रदर्स इलेव्हन-भाटघर यांनी तर द्वीतीय विजेता श्री स्वयंभू उत्तरेश्वर संघ दहागाव – निमदेवाडी यांनी जिंकला. वरील दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रिकेट स्पर्धा नियोजन समिती चे प्रमुख श्री सुभाष दळवी, तर सभागृह नियोजन समितीचे प्रमुख, उपाध्यक्ष श्री संदीप सुखदरे यांनी मंच खजिनदार नंदकुमार दळवी,सदस्य संदेश दळवी, समीर खोचरे, सुनिल तांबे,नितिन दळवी,सुर्यकांत खेराडे यांनी सहकार्य केले तर श्रीमती ज्योती साळवी- मोरे यांनी विशेष योगदान अध्यक्ष श्री सुभाष तांबे यांचे मार्गदर्शनाखाली केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक गोरीवले तर आभार प्रदर्शन गणेश तांबिटकर यांनी केल्याची माहीती मंचाचे सचिव श्री नरेश चव्हाण यांनी दिली आहे.