कणकवली : बेळणे येथील श्री पावणादेवी क्रिकेट मंडळातर्फे १३ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत दशक्रोशी मर्यादित प्रीमिअर लीग-२०२५ चे आयोजन केले आहे. स्पर्धेकरिता प्रथम २५,०२५ रु. व चषक, द्वितीय १५,०२५ व चषक बक्षीसे आहेत. याशिवाय मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक अशी वैयक्तिक स्वरुपातील बक्षीसे आहेत. ही स्पर्धा लिलाव पद्धतीने होणार आहे. या स्पर्धेचा आनंद लुटण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.










