गुहागर । प्रतिनिधी :तवसाळ पंचक्रोशी ची श्रद्धा व ऐतिहासिक देवस्थान श्री महामाई सोनसाखळी देवी मंदिर कलशारोहण सोहळा.एम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम शुक्रवार १४ फेब्रुवारी २०२५ ते १७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे.
तवसाळ गावची माहेरवाशीण ची पाठराखी श्री देवी महामाई सोनसाखळी देवी……
सर्व भक्तगणांनी सर्व कार्यक्रमास आपल्या माहेरवाशीण, कुटुंबीय मित्रपरिवार व सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि श्री देवी महामाई सोनसाखळीचे दर्शन, महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन
अध्यक्ष श्री. मोहन यशवंत गडदे यांनी केले आहे.
गुहागर – तालुक्यातील तवसाळ पंचक्रोशी ची श्रद्धा स्थान असणारी आणि समग्र माहेरवाशिणी ची पाठीराखी आणि सर्वसामन्यांच्या हाकेला त्यांच्या नवसाला पावणारी प्राचीन आणि ऐतिहासिक देवता म्हणजे श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिर देवस्थान…
या देवीच्या नूतन मंदिरा चा कलशा रोहण सोहळा पार पाडत आहे. या उत्सवनिमित्त पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण सुरू आहे. श्री देवी महामाई सोनसाखळी ट्रस्ट चे वतीनं या संपूर्ण उत्सवाची सूत्रबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
गेले अनेक वर्ष इथल्या भक्तांनी पाहिलेलं नेत्रदीपक अशा नूतन मंदिराच स्वप्न आज पूर्ण होत आहे. मुळातच तवसाळ रोहिले बीच चे समुद्र किनाऱ्याहून जाणाऱ्या रस्त्या लगत निसर्गाच्या कोंदणात चारी बाजूच्या हिरव्यागार वनराई मध्ये विराजमान असणाऱ्या देवी च मंदिर आता अनेक पर्यटकांचं आकर्षण केंद्र बनत आहेत. अनेक श्रद्धाळू आपले व्यथा, भीती, अडचणी घेऊन देवीकडे येत असतात आणि जाताना एका आत्मिक समाधानाने डोळ्यातील आनंदाश्रू लपवत निश्चित होऊन जात आहेत, जणू काही त्यांची पूर्ण जबाबदारी आता श्री देवी महामाई सोनसाखळी देवी ने घेतली आहे या विश्वासावर च.
रत्नागिरी जिल्ह्यातील जी काही मानाची २७ ग्रामदेवता आणि देवस्थान आहेत ज्यांना १०० वर्ष पूर्वी ब्रिटिश सरकारने ही या देवतांच्या अस्तित्वाची प्रचिती आल्याने त्यांना मानाचं ताम्रपट ( सनद) दिली आहेत त्या देवस्थान पैकी आमची श्री देवी महामाई सोनसाखळी देवी हे आज अभिमानाने उल्लेख करावा लागतोय.










