सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीमार्फत दि. 01 रोजी उद्घाटन सोहळा
गुहागर | प्रतिनिधी : सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीमार्फत दाभोळ खाडीमध्ये फरारे परचुरी फेरीबोट सेवा सुरु केली जात आहे. हा फरारे परचुरी फेरीबोट उद्घाटन सोहळा सोमवार दि. 01 मे 2023 रोजी सायंकाळी 4 वा. परचुरी फेरीबोट जेटी येथे आय़ोजित करण्यात आला आहे. तरी कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून शुभआर्शिवाद द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. स्थानिक जनतेच्या सोयीसाठी व कोकणात पर्यटन विकास व्हावा या उद्देशाने ही फेरीबोट सेवा सुरु करण्यात येत आहे. या सोहळ्यासाठी बॅक ऑफ इंडिया, दापोलीचे मॅनेजर, मा. श्री. अनंत डिगे. उद्योजक, मा. श्री. राजन दळी, (कृपा हेअर टॉनिक), मा. श्री. मुश्ताकअली खोत, B.Sc.(Agri) [Agriculturist] मा. श्री. डॉ. सुभाष जवळगीकर M.B.B.S आणि मा. श्री. अब्बास कारभारी M.Sc. (Agri) हे सन्माननीय पाहूणे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीचे चेअरमन डॉ. चंद्रकांत मोकल व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. योगेश मोकल यांचेकडून करण्यात आले आहे.