उद्यापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन
मोडकाआगर l वार्ताहर :गुहागर तालुक्यातील तवसाळ श्री महामाई सोनसाखळी देवी मंदिराचा कलशारोहण सोहळा विविध कार्यक्रमानी आयोजित करण्यात येणार आहे. गेली अनेक वर्ष हे गावच्या खोतांच्या नेतृत्वात सांभाळले जाणारे हे मंदिर व्यवस्थापन नवीन मंदिराच्या उभारणी करता शासनमान्य ट्रस्टच्या नेतृत्वात आणले आहे ज्या उद्देशाने ट्रस्टची स्थापना करण्यात आली त्याप्रमाणे भव्य दिव्य असे महामाई देवीचे मंदिर उभे राहिले आहे.या सोहळ्यानिमित्त शुक्रवार १४ ते १७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत साजरा होणार आहे.कलशारोहण सोहळ्यानिमित्त शुक्रवार दि. १४ रोजी सकाळी १० ते २ वाजता कलश मिरवणूक (महामाई सोनसाखळीच्या गादी असणाऱ्या तवसाळ येथील राजेश रमेश सुर्वे यांचे घरापासून मंदिरापर्यंत मिरवणूकीने पंचधातूच्या कलशाचे आगमन, दुपारी २ वाजता महाप्रसाद, रात्री ९ वाजता स्थानिक भजन व निमंत्रित येणारी भजने.
शनिवार दि. १५ रोजी सकाळी ९ ते १२ वाजता शोडषोपचारे पूजन व देवींना रूप लावणे, दुपारी १२.३० ते २ वाजता कलशारोहण सोहळा, दुपारी २ वाजता महाप्रसाद, सायं ७ ते १० वाजता स्थानिक पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे भजन, रात्री १० वाजता डबलबारी. भजन सम्राट बुवा भगवान लोकरे विरुद्ध भजन सम्राट बुवा प्रमोद हर्यान असा पारंपारिक डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि.१६ रोजी सकाळी १० ते २ वा. शुभकाळात देव स्थापना होमहवन, दृष्ट ओवाळणी, दुपारी २ वाजता महाप्रसाद, सायं ७ ते १० वाजता स्थानिक पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे भजन, रात्री १० वाजता निमंत्रित येणारी भजने सोमवार.दि. १७ रोजी सकाळी १० ते १ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, महाआरती, दुपारी २ वाजता महाप्रसाद, सायं ७ ते १० वाजता स्थानिक पंचक्रोशीतील ग्रामस्थांची भजन, रात्री १०.३० वाजता तवसाळ पंचक्रोशीतील बाबर तांबड नमन नाट्य मंडळाचे बहुरंगी नमन साजरे होणार आहेत. तरी कलशारोहण सोहळा कालावधीत श्रीदेवी महामाई सोनसाखळी सह सर्व ग्रामदेवतांच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याची विनंती श्रीदेवी महामाई सोनसाखळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष खोत श्री.मोहन यशवंत गडदे यांनी केली आहे.











