एसटी थांबा व रस्ताप्रश्नी चिखली साळवीवाडी वासियांचे थेट उपमुख्यमंत्र्यांना साकडे

गुहागर प्रतिनिधी:
तालुक्यातील चिखली साळवी वाडी येथील ग्रामस्थांनी राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेत त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. देवगिरी बंगला, जे. एम. मेहता मार्ग, मलबार हिल येथे दि. ३१ मार्च २०२६ रोजी शिष्टमंडळाने भेट घेतली.
चिखली साळवीवाडी कडे जाणारा रस्ता दुरुस्ती करून द्यावी, साळवीवाडी थांब्यावर एसटी बस थांबावी या प्रमुख मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांची भेट घडवून आणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माणिकराव भांडगे यांच्या नेतृत्वाखाली साळवी वाडी शिष्टमंडळाची बैठक घडवून आणली. यावेळी लवू महादेव साळवी, विजय पांडुरंग साळवी तुळशीदास आत्माराम साळवी, अंकुश महादेव साळवी, उमेश दिनकर साळवी, विजय भाई साळवी उपस्थित होते.