निरबाडे येथील ज्येष्ठ समाजबांधव भिकाजी मासवकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
चिपळूण (प्रतिनिधी)–:- रोहिदास समाज सेवा संघ सातगाव विभाग ता खेड या सामाजिक संघटनेतर्फे रविवार दिनांक २ मार्च रोजी आंबडस रोहिदासवाडी येथे श्री संत रोहिदास महाराज जयंती साजरी केली जाणार आहे. यावेळी धार्मिक कार्यक्रमासह समाज बांधवांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये रोहिदास समाज सेवा संघ सातगाव विभागातर्फे यावर्षी निरबाडे येथील ज्येष्ठ समाजबांधव भिकाजी मासवकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागध्यक्ष संतोष तुकाराम सावर्डेकर यांनी दिली.
रविवार दिनांक २ मार्च रोजी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सव साजरी करण्यात येणार आहे. यावेळी सकाळी १० वाजता श्री संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, सकाळी ११ वाजता भजन, दुपारी १२ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू, १२.३० वाजता श्री संत रोहिदास महाराजांच्या जीवन चरित्रावर मान्यवरांची मनोगते, समाज बांधवांचा सन्मान असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. सातगाव विभागातर्फे निरबाडे येथील ज्येष्ठ समाजबांधव भिकाजी मासवकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दरवर्षी हा पुरस्कार सातगाव विभागातील समाजासाठी योगदान व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एका ज्येष्ठ समाजबांधवाला दिला जाणार आहे, अशी माहिती विभागध्यक्ष संतोष सावर्डेकर यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभाग अध्यक्ष संतोष सावर्डेकर, उपाध्यक्ष प्रभाकर पेवेकर, ह. भ. प. शंकर कदम, सचिव उमेश कराडकर, सहसचिव संजीवन कदम, खजिनदार गणेश कदम, प्रकाश पेवेकर, संघटक रुपेश मासवकर, सदस्य सोनू पेवेकर, संतोष गंगाराम कदम, संतोष तुकाराम कदम, संतोष पेवेकर, ह. भ. प. अनंत कदम, दत्ताराम कराडकर, आशिष कदम आदी मेहनत घेत आहेत.











