खेड आगारातील ३० बसेस निघणार स्क्रॅप’ मध्ये

कालबाह्य झाल्याने प्रशासनाचा निर्णय, बसेसची संख्या होणार निम्मी, ७ बसेसच्या बदल्यात नवीन बसेंस नाहीच
खेड(प्रतिनिधी)
खेड एसटी आगारातील अनेक बसफेऱ्यांमधील तांत्रिक बिडामुळे नियोजित फेऱ्या बसेसअभावी अचानक रद्द कराव्या लागत आहेत. येत्या २-३ वर्षात ३० हून अधिक कालबाह्य बसेस भंगारात काढण्यात येणार आ यामुळे आगारातील बसेसची संख्या निम्म्यावर येणा असल्याने आगार व्यवस्थापनाच्या चिंतेत भर पडर आहे. आधीच बसेसअभावी खासगी वाहतुकीद्वारे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असताना नव्या समस्येची भर पडणार असल्याने प्रवाशांचीही धाकधूक वाढली आहे.
येथील बसस्थानकातून उशिराने मार्गस्थ होणाऱ्या बसफेऱ्यांमुळे प्रवाशांच्या मार्गात रखडपट्टी कायम आहे. विविध मार्गांवर रस्त्यात अचानक बंद पडणाऱ्या बसेससह रद्द बसफेऱ्यांचा प्रवाशांना फटका बसत आहे. काही नादुरुस्त स्थितीतील परतीच्या बसफेऱ्या बसस्थानकात न जाता प्रवाशांना घेवून थेट आगारात जात असल्याने तर बसस्थानकातून सुटलेल्या फेऱ्या आगारात येवून बदलण्याची वेळ चालक-वाहकांवर येत आहे. यामुळे प्रवाशांना आगाराबाहेर उभे राहून अन्य बसफेरीची प्रतीक्षा करावी लागत आहे.
अपुऱ्या बसेसमुळे नियोजित मार्गावरील फेऱ्या रद्द
झाल्याचे कारण देण्यात येत असल्यामुळे प्रवाशांना विशेषतः महिलांना खासगी वाहतुकीचा आधार घेत आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. आगारासाठी सद्यस्थितीत ८५ गाड्या उपलब्ध असून यामध्ये ६४ साध्या गाड्या, ६ शिवशाही, ३ स्लीपर व ११ खासगी व १ आरटीओ बसचा समावेश आहे. यातील २० गाड्या आठ वर्षांच्या आतील तर ५४ गाड्या दहा वर्षांवरील आहेत. २०२३-२४ मध्ये ७ साध्या गाड्यांना १५ वर्षे लोटल्याने त्या कालबाह्य झाल्या आहेत. भंगारात काढलेल्या बसेसच्या जागी अन्य गाड्या अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यात येत्या २-३ वर्षात ३०हून अधिक बसेसना १५ वर्षे होणार असल्याने त्या भंगारात काढल्या जाणार आहेत. आधीच ‘स्क्रॅप’ला काढलेल्या गाड्यांच्या जागी नवीन बसेस उपलब्ध झालेल्या नसतानाही कालबाह्य गाड्यांच्या बदल्यात नवीन बसेस कितपत उपलब्ध होतील, या बाबत सांशकता व्यक्त केली जात आहे. तांत्रिक बिघाडामुळे बंद पडणाऱ्या आणि बसेसअभावी नियोजित बसफेऱ्या रद्द होण्याच्या समस्येमुळे पुढील काळातही आगार, व्यवस्थापनाची, डोकेदुखी कायम राहणार आहे.
मोठा परिणाम होणार नाही
यापूर्वी भंगारात निघालेल्या बसेसच्या बदली अन्य बसेस उपलब्ध झाल्या नसल्या तरी महामंडळाकड लवकरच आगारासाठी नवीन बसेस उपलब्ध होतील पुढील काही वर्षात कालबाह्य ठरणाऱ्या काही बसेस कालबाह्य होणार असल्या तरी याचा मोठा परिणाम होणार नसल्याचे आगारप्रमुख रणजीत राजेशिर्के यांनी स्पष्ट केले.