Lखेड(प्रतिनिधी)
खेड रेल्वे स्थानक परिसर स्वच्छतेसाठी प्रशासनाला सवड नाही त्यामुळे येथील रिक्षा व्यावसायिकानी पुढाकार घेत परिसर स्वच्छ करत आहेत
सुशोभिकरणानंतर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत
कुठलीच कार्यवाही झालेली नसून दुर्लक्षाबाबत टीकेची झोड प्रवाशांसह उठल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने. एक दिवस स्वच्छतेचे सोपस्कर पाडले. मात्र त्यानंतर स्वच्छतेकडे कानाडोळा आल्याने रिक्षा व्यावसायिकांनीच सुशोभिकरण परिसरात स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला .
रेल्वेस्थानक सुशोभिकरणातील कामे दर्जाहीन झाल्याचा आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी मध्यंतरी केला. याबाबत कार्यवाही न झाल्यास मनसे स्टाईलने दणका देण्याचा इशाराही दिला होता. मात्र अद्याप याबाबत कोणतीच भूमिका घेण्यात आलेली नाही
दरम्यान स्थानक परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याचा त्रास स्थानक प्रवाशांसह रिक्षा व्यावसायिकांनाही सहन करावा लागत आहे. मात्र स्वच्छतेबबात रेल्वे प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवले आहे. यामुळे त्रस्त रिक्षा व्यावसायिकांनीच साफसफाईसाठी पुढाकार घेतला आहे. दररोज सकाळी रिक्षा व्यावसायिकांचे हात स्वच्छतेसाठी राबत आहेत. मात्र परिसर साफसफाईसाठी प्रशासनाला सवड मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.











