Tourists from Goa beat up a car driver in Ottawana
बुधवारी मध्यरात्रीची घटना : पोलिसांत तक्रार
सावंतवाडी । प्रतिनिधी : ओटवणे येथील बाबाजी अनंत तारी यांच्या ताब्यातील क्वालीस गाडी व गोव्यातील पर्यटकांची ओमनी यांची धडक बसल्यानंतर संबंधित पर्यटकांकडून तारी यांना मारहाण झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री सावंतवाडी बाहेरचा वाडा येथील पेट्रोल पंप नजिक घडली. बाबाजी तारी हे मालवण येथून ओटवणे येथील आपल्या घरी परतत असताना बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. याबाबत बाबाजी तारी यांनी सावंतवाडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.











