नवीन शैक्षणिक धोरण देशाला दिशा देणारे : मिलिंद कडवईकर

माखजन | वार्ताहर : जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात होणाऱ्या अमूलाग्र बदलांचा विचार करता नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक याना सक्षम करणे आवश्यक आहे.नवीन शैक्षणिक धोरण शिक्षकानी समजून घेऊन प्रभावी कामकाज करावे.नवीन शैक्षणिक धोरण देशाला दिशा देणारे ठरेल असा विश्वास तज्ञ मार्गदर्शक मिलिंद कडवईकर यांनी व्यक्त केला.ते देवरुख येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणात बोलत होते.ते नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, भारताला महासत्ता बनवताना सुजाण नागरिक घडवण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे.नवीन शैक्षणिक धोरणाची प्रामाणिक पणे अमलबजावणी झाल्यास भारत निश्चित महासत्ता होईल असे नमूद केले.१९८६ नंतर ३४ वर्षानंतर शैक्षणिक धोरण बदलले जात आहे.बदल्या गरजा,जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी असलेला शैक्षणिक बदल,व्यावसायिक शिक्षण, निरंतर शिक्षण,समाजाभिमुख शिक्षण,विद्यार्थ्याला घडवता घडवता वैश्विक नागरिक बनवणे,भारतीयत्वाचा सखोल अभिमान रुजवणे आदी सगळ्याच गोष्टीचा अंतर्भाव नवीन शैक्षणिक धोरणात केला आहे.असे नमूद केले.
आज विद्यार्थ्यांना आवड असलेल्या क्षेत्रातील शिक्षण देणे हे नवीन शैक्षणिक धोरणाचा हेतू आहे.असे सांगितले.या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रप्रमुख निकिता नलावडे, दिव्या भाटकर,विषयतज्ञ समीर काब्दुले,सानिका भितळे आदी उपस्थित होते