चिपळूण न.प.तर्फे उद्या “छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव”

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नगरपरिषदे तर्फे दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध स्तुत्य उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दि. १९ रोजी सकाळी ८ वाजता नगर परिषदेच्या मुख्य द्वाराजवळील ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. सकाळी ८.१५ वाजता ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण , सकाळी ९ वाजता – इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये कर्मचारी व विविध संस्था; एनजीओज् यांचे करीता रक्तदान शिबीर, सकाळी १० वाजता – ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्या समोर शिवशाहिर रंगराव पाटील, कोल्हापूर यांचा ‘शिवजन्म’ पोवाडा सादरीकरण तर सायंकाळी ६.३० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील मोकळ्या जागेत स्वरांजली ग्रुप प्रस्तुत ‘छावा महाराष्ट्राचा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.

श्री ग्रामदेव जूना कालभैरव देवस्थान प्रांगण
कै बापू बाबाजी सांगावकर मैदान चिपळूण येथे पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच सर्व नागरिक / संस्था / मंडळे यांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावे अशी विनंती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे. तर अधिक माहितीसाठी प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, रोहित खाडे, राजेंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.