Bhakti Khamkar’s great success in shooting sports
महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती राज्य पुरस्कारासाठी नामांकन
संतोष कोत्रे | लांजा : तालुक्यातील विलवडे गावची सुकन्या असलेल्या भक्ती भास्कर खामकर हिने नेमबाजी क्रीडा प्रकारात धवल यश संपादन केले असून तिची शासनाच्या शिवछत्रपती राज्य पुरस्कारा साठी मानांकन झाले आहे.
. लांजा तालुक्यातील विलवडे गावची सुकन्या असलेल्या भक्ती हि सध्या कोपरगाव डोंबिवली येथे वास्तव्याला आहे. नेमबाजी स्पर्धेत तिने आतापर्यंत चार पदकांची कमाई केली आहे. आपले मूळ गाव असलेल्या विलवडे येथे आल्यानंतर भक्ती आई-वडिलांबरोबर नेमबाजीचा सराव करत असे. मुंबईत तिचे शिक्षण सुरू आहे. राज्यस्तरीय ,आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने नेमबाजीत आपले कौशल्य सिद्ध केले आहे .भक्ती हिची आई मुंबई पोलीस दलात कार्यरत असून तीच तिची खरी प्रेरणा आहे. राज्य शासनाच्या शिवछत्रपती राज्य पुरस्कारासाठी तिचे मानांकन झाले असून राज्य निवड समिती समितीने ही मानांकन जाहीर केले आहे.भक्ती हिने मिळवलेल्या या सुयाशाबद्दल तिच्यावर तालुक्यातून सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षा होत आहे.










