मंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला केले नमन; *विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व चित्रकला स्पर्धांना प्रतिसाद
कणकवली :कणकवलीत सकल मराठा समाज आयोजित शिवजयंती उत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास मत्स्य व बंदर विकास मंत्री , पालकमंत्री नितेश राणे यांनी अभिवादन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय , जय भवानी जय शिवाजी , एक मराठा लाख मराठा अशा घोषणा उत्स्फुर्तपणे शिवभक्तांनी दिल्या.
यावेळी सकाळीच छत्रपती महाराज शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाजाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त शिवपुतळ्याचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिवजयंती कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित दर्शवून शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मराठा समाजाच्यावतीने मोटारसायकल रॅली ,वक्तृत्व स्पर्धा , चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सेंट उर्सुला स्कुलच्या विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य व विविध कार्यकम सादर केले.
यावेळी भाई परब, बच्चू प्रभूगावकर, बबलू सावंत, सोनू सावंत, महेंद्र सांब्रेकर, सुशील सावंत, महेश सावंत, संदीप राणे, तेजस राणे, सूर्यकांत वारंग, एस.एल.सपकाळ, शेखर राणे, जिल्हा बॅंकेचे संचालक समीर सावंत, रामू विखाळे, सादिक कुडाळकर, शैली सावंत, मेघा सावंत, यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.












