रत्नागिरी | प्रतिनिधी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे गुरुवारी दि. 20 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. दुपारी दोन वाजता सिंधुदुर्ग येथून ते रत्नागिरी प्रयाण करणार असून संध्याकाळी 4 वाजता श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील संत शिरोमणी गजानन महाराज प्रकट दिन सोहळा आणि नागरी सत्कार समारंभास ते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमानंतर ते कणकवली येथे प्रयाण करतील.











