रत्नागिरी :
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने आज बुधवार, दिनांक २५ जून २०२५ रोजी विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्यांचे वाटप आणि व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका संजना तारी होत्या, तर प्रमुख वक्ते म्हणून संस्थेचे प्रवर्तक संदीप पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाणा-या कामगार व वंचित वर्गातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळा नेहमीच पुढाकार घेत असते. या उद्देशाने जिजाऊ संस्थेमार्फत गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक संधी, करिअर निवड आणि आत्मनिर्भरतेविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवाजी बोटके यांनी तर आभार प्रदर्शन स्नेहल पावरी यांनी केले









