भाजपा सरचिटणीस रविंद्र नागरेकर यांची अशीही सामाजिक बांधिलकी

 

राजापूर (वार्ताहर): येथील राजापूर ग्रामिण रूग्णालयात खेडयापाडयातून उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेवून भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर यानी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दहा टयुबलाईट संच या रूग्णालयाला भेट दिले आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानानिमित्त भारतीय जनता पार्टी राजापूरच्या वतीने ग्रामिण रूग्णालयात रूग्णाना फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. नागरेकर उपस्थीत होते. यावेळी बहुतांशी वॉर्डमध्ये काळोख असल्याचे लक्षात आल्यावर श्री. नागरेकर यांनी याबाबत रूग्णालय व्यवस्थापनाकडे चौकशी केली असता टयुब लाईट नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. यावेळी त्यांनी दोनच दिवसांवर भाजपाचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाला आपण टयुबलाईट देवू असा शब्द दिला होता.

त्याप्रमाणे दहा टयुबलाईटचे संच श्री. नागरेकर यांनी रूग्णालय व्यवस्थापनाकडे सुपुर्द केले असून टयुबलाईट अभावी होणारी रूग्णांची गैरसोय आता दूर होणार आहे.

श्री. नागरेकर हे गेली अनेक वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. वारकरी सांप्रदाय तसेच लुपीन फाऊंडेशनच्या माध्यमातून तालुक्यात भरीव असे काम केले आहे. त्यांनी रूग्णांची होणारी गैरसोय ओळखून ग्रामिण रूग्णालयाला दिलेल्या टयुब लाईट संचाबद्दल त्यांना रूग्णालय व्यवस्थापनाने धन्यवाद दिले आहेत.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठनेते राजन देसाई, पूर्व मंडळ भाजपाअध्यक्ष सुरेश गुरव, विजय कुरूप, सरचिटणीस अमोल सिनकर, प्रा. मारूती कांबळे, महिला तालुकाध्यक्षा सौ. सुयोगा जठार, ग्रामिण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक सौ. मंगला चव्हाण व कर्मचारी वृंद उपस्थीत होता.