असगणी शाळा नंबर २ मध्ये विद्यार्थ्याना खाऊ वाटप

ना. योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

चिपळूण (वार्ताहर) : ना.राज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद आदर्श शाळा असगणी नंबर २ या शाळेमध्ये शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मार्फत शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

आ. योगेश कदम पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांना मंत्री पद मिळाले . त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले. नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी असगणी येथील प्राथमिक मराठी शाळा नंबर २ येथे मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी धामणदेवी विभाग युवासेना उप तालुका अध्यक्ष चेतन पवार, शिवसेना शाखाप्रमुख असगणी सचिन बुरटे, ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र धाडवे, उपशाखा प्रमुख असगणी अनिल गीते, युवा सेना शाखाप्रमुख विशाल इटले, प्रदीप शिगवण, अजय शिगवण , अक्षय पवार, साहिल बुरटे, किरण शिगवण, महेंद्र पदुमले,
अशोक पदुमुले, सुनील धाडवे अशोक शिगवन, तेजस मायनाक,
धीरज नायनाक अरुण पदुमले, राजेश शिगवन, राजेश ईपते, शेखर धाडवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सर्वांचे आभार मानले.