दिनांक २०/०२/२०२४ रोजी ११.०० वाजता, वीर सावरकर नाट्यागृह, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे रत्नागिरी पोलीस दलामार्फत “व्हिजीटर मॅनेजमेंट सिस्टम (VMS), १० चारचाकी वाहने व १४ ई-बाइक” यांचा लोकार्पण सोहळा व उद्घाटन समारंभ मा. ना. श्री. उदय सामंत, मंत्री, उद्योग, मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री, रत्नागिरी जिल्हा यांच्या शुभ हस्ते आयोजित करण्यात आलेला आहे.

या उद्घाटन समारंभ प्रसंगी मा. ना. श्री. योगेश कदम, राज्य मंत्री, गृह(शहरे), महसूल, ग्राम विकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन यांची विशेष उपस्थिति असणार आहे तसेच जिल्ह्यातील मान्यवर खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमा करिता विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र मा. श्री. संजय दराडे व मा. श्री. एम देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी, रत्नागिरी हे उपस्थित असणार आहेत.
नागरिकांचे जीवनमान सुकर करण्याकरिता रत्नागिरी पोलीस दलामार्फत व्हिजीटर मॅनेजमेंट सिस्टम (VMS) प्रणालीचा वापर करण्यात येणार, 10 चार चाकी वाहनांचा गुन्हे प्रतिबंध व पेट्रोलिंग करिता वापर तसेच ई-बाइक च्या माध्यमातून सागरी गस्त करण्यात येणार तसेच पर्यटक सुरक्षितता आणि दुर्घटना प्रतिबंध करिता वापर होणार.
या उद्घाटन समारंभा प्रसंगी सायबर जनजागृतीचे देखील प्रदर्शन होणार आहे.
तरी, रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या संखेने उपस्थित राहावे अशी विनंती श्री. धनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी केली आहे.











