गावखडी / वार्ताहर : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत छत्रपती शिवाजीमहाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या प्रारंभीस छत्रपती शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मेर्वी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.या प्रसंगी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर, उपशिक्षिका सौ.संजया पावसकर, उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर, ऐक्यवर्धक संघ मेर्वीचे अध्यक्ष श्री. हेमनाथ खरडे , शाळा व्यवस्थापन समिती सदस्या श्रावणी मेस्त्री, माता पालक संघाच्या सदस्या मंजिरी पावसकर, शालेय मंत्रीमंडळाचे मुख्यमंत्री श्रवण गोठणकर, उपमुख्यमंत्री श्रावणी कुरतडकर शिवाजीमहाराजांची वेशभूषा करणारा कु.नंदन कुरतडकर मावळा वेशभूषा करणारा आयूष म्हादये , अंगणवाडी शिक्षिका सौ.सुनिता मेस्त्री, सौ.बाणे मॅडम, मदतनीस श्रीम. आकांक्षा गुरव, दिपीका भूते ,पालक , ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त भाषणे केली. त्यानंतर मेर्वी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर ,हेमनाथ खरडे आदिंनी शिवाजीमहाराज यांच्या जीवनातील प्रसंग आपल्या मनोगतातून कथन केले.
शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त शिवरायांचा जल्लोष करीत प्रभात फेरी काढण्यात आली . शेवटी उपशिक्षिका सौ.संजया पावसकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.












