मोडकाआगर | वार्ताहर : गुहागर येथील लिटिल फ्लॉवर प्री स्कूल गुहागर येथील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेह संमेलन नुकतेच गुहागर तेलीवाडी येथील लिटिल फ्लॉवर प्री स्कूल मध्ये संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनासाठी पालकांसह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र अर्जुन भागडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुहागर नगरपंचायत माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे,मधुकर भागडे, राकेश गावडे, सुजाता गजानन जोशी, अभिजीत रायकर, संदेश भागडे, संदीप फटकरे, महेंद्र जोशी, वैभव जोशी, प्रमिलेश घाणेकर, शैलेश साटले, अंकिता अरुण रहाटे तसेच किड्स लाईफ इंग्लिश मीडियम स्कूल पालशेतच्या संचालिका आसावरी वराडकर
शाळेच्या संचालिका सोनाक्षी साटले मॅडम , सुवर्णा सकपाळ, हरीश सकपाळ, सरस्वती साटले आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्नेहसंमेलमध्ये या स्कूल मधून बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर २४/२५ कु.आयुष बालाजी मुंडे याला मिळाला.बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर चा अवॉर्ड गुहागर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे यांच्या हस्ते देण्यात आहे. स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी मोबाईलचे दुष्परिणाम काय आहेत याविषयी सादर केले, तसेच देशभक्तीपर आधारित गीत, फनी डान्स त्याचप्रमाणे साटले स्टडी हाऊसच्या क्लासच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा विविध नृत्य सादर केले.लिटिल फ्लॉवर प्री स्कूल व साटले स्टडी हाऊस क्लासेसच्या संचालिका सोनाक्षी प्रशांत साटले यांनी सर्वांचे विशेष आभार मानले.












