गुहागर शहरातील राष्ट्रीय महामार्गावर ‘कारपेट’ करा

गुहागर शहर शिवसेनेच्यावतीने निवेदन, अन्यथा आंदोलनाचा इशारा

गुहागर | प्रतिनिधी : गुहागर शहरातील राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. या खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी न करता खड्डे बुजवून कारपेट करण्यात यावे, अशी मागणी करत अन्यथा अम्हाला रास्ता रोको आंदोलन करावे लागेल, असा इशारा शहर शिवसेनेच्यावतीने गुहागर तहसीलदारांना निवेदनाद्वारे • देण्यात आला आहे.या निवेदनात म्हटले आहे की, – शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली चार वर्षे रखडले आहे. जोपर्यंत महामार्गाचे काम होत नाही, तोपर्यंत • रस्ता सुस्थितीत ठेवण्याचे काम राष्ट्रीय महामार्गाचे आहे.

 

मात्र पावसाळ्यापासून शहरातील रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत. हे खड्डे नुकतेच खडी व मातीने भरण्यात असल्याने संतत्प प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे गुहागर शहर नाका ते शासकीय विश्रामधाम या अंतरावर खड्डे बजुवून त्यावर डांबराचे कापरपेट करण्यात यावे. सदर काम २८ फेब्रुवारी. अखेरपर्यंत करण्यात यावे. अन्यथा आम्हाला रास्तारोको आंदोलन करावे लागेल. असा इशारा शिवसेनेच्यावतीने देण्यात आला आहे.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, शहर प्रमुख निलेश मोरे, प्रदिप बेंडल, महेश तावडे, अमोल गोयथळे, शहर संघटक राकेश साखरकर, सुवा सेना शहरपमुख राकेश गावडे, साई देवकर, राजेंद्र बागकर उपस्थित होते.