शृगारतळी (वार्ताहर ) भक्तांच्या हाकेला धावून जाणारी व नवसाला पावणाऱ्या तवसाळ येथील जागृत देवस्थान श्री महामाई सोनसागरी देवीचा कलशारोहण सोहळा अत्यंत जल्लोषपूर्ण व उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.14 फेब्रुवारी रोजी देवस्थानचे मानकरी राजेश रमेश सुर्वे यांचे घर ते महामाई मंदिर पर्यंत कलश मिरवणूक हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत, सनई ढोल ताशा पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये काढण्यात आली.रात्री स्थानिक सुरू भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.15 फेब्रुवारी रोजी शोडशोपचारे पूजन तसेच देवीला, रूपे लावण्याचा कार्यक्रम विधिवत करण्यात आला . सदर कार्यक्रमाला तालुक्यातील माहेरवाशीणी भक्तगण यांचा उस्फूर्त सहभाग लाभला होता.त्यादिवशी रात्री श्री भगवान लोकरे श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ भांडुप व श्री प्रमोद हरियाण श्री पावणादेवी प्रासादिक मंडळ घालवली तालुका देवगड या सुप्रसिद्ध भजन सम्राटांची डबलबारी कार्यक्रम आयोजित केला होता .तसेच देवस्थापना होम हवन ,दुष्ट ओवाळणी व श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती .रात्री तवसाळ पंचक्रोशीतील बहुरंगी नमन कार्यक्रम आयोजित करण्यात आला . सदर कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोचला होता.श्री महामाई संसारी मंदिराचा कलशारोहण सोहळा कार्यक्रमाला हजारो भाविकांनी हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री मोहन गडदे अध्यक्ष ,सर्व पंच कमिटी व सर्व मान्यवर, ग्रामस्थ ,पदाधिकारी यांनी मेहनत घेतली .सदर कार्यक्रमासाठी तवसाळ पंचक्रोशीतील मुंबई निवासी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.










