मालवणात राष्ट्र विरोधी घोषणा देणाऱ्या परप्रांतीय मुस्लिम भंगार व्यवसायिका विरोधात संताप ; कठोर कारवाईची मागणी
पोलिसांकडून अटकेची कारवाई
मालवण | प्रतिनिधी : जय श्री राम… भारत माता की जय… छत्रपती शिवाजी महाराज की जय… इस देश मे रहना होगा… वंदे मातरम कहना होगा… अशी गगनभेदी घोषणाबाजी करतं मालवणात हिंदू बांधवानी पोलीस ठाण्यावर धडक दिली. देशद्रोही प्रवृत्तीच्या राष्ट्र विरोधी घोषणा देणाऱ्या परप्रांतीय मुस्लिम भंगार व्यवसायिका विरोधात संताप व्यक्त करतं मालवणात हिंदू समाज एकवटला.
मुस्लिम समाजातील काही समाजकंटक, समाज विघातक, राष्ट्र विघातक व जिहादी मानसिकतेच्या लोकांकडून सातत्याने हिंदू व्यक्तीना व त्यांच्या भावनाना लक्ष करण्याचे काम सुरु आहे. यांच्यावर तातडीने परिणामकारक कारवाई व्हावी. यां आशयचे निवेदन पोलीस प्रशासनास देण्यात आले. यावेळी मोठया संख्येने सकलहिंदू समाज बांधव उपस्थित होते.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने रविवारी पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरु असताना मालवण शहरात आडवण परिसरात मात्र परप्रांतीय भंगार व्यवसायिकाकडून भारत विरोधी घोषणा दिल्याचा प्रकार घडला. याबाबत हिंदू समाज संतप्त बनला. तक्रारदार सचिन वराडकर व हिंदू समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांनी त्या देशद्रोही भंगार व्यावसायिक कुटुंबावर कारवाई केली. किताबुल्ला हमीदउल्ला खान, आयेशा किताबुल्ला खान रा. आडवण मालवण यां दोघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायांलयात हजर करण्यात आले. मात्र त्यांचे वकीलपत्र कोणीही घेतले नसल्याने दोघांनाही सावंतवाडी कारागृहात नेण्यात आले. मात्र यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे यासाठी मालवण देऊळवाडा येथे एकत्र येत शेकडो हिंदू समाज बांधवानी मोटरसायकल रॅली काढून व जोरदार घोषणा देत मालवण पोलीस ठाण्यात धडक दिली.
मागील काही महिन्यात देशविरोधी कारवाई बाबत संबंधितांची सखोल चौकशी व्हावी. भंगारवाले, भाजीवाले व बाहेरील आलेले मुस्लिम व्यवसायिक यांची पूर्ण चौकशी करावी व यांचे आधार कार्ड तपासून मुख्य रहिवासी कुठले आहेत याची शहानिशा करावी. अश्याही मागण्या यावेळी करण्यात आला.
यां दरम्यान त्या देशद्रोही मुस्लिम परप्रांतीय भंगार व्यावसायिका विरोधात मालवण नगरपरिषद प्रशासनाकडे आमदार निलेश राणे यांच्या वतीने निवेदन देताना तो व्यावसायिक राहत असलेल्या ठिकाणी अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम केले आहे ते तात्काळ हटवण्याची भुमिका मांडण्यात आली. त्यानुसार तात्काळ कारवाई प्रशासनाने करून अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम हटवले.
दरम्यान, परप्रांतीय मुस्लिम भंगार व्यवसायिकाने दिलेल्या देश विरोधी घोषणा व भूमिकेचा मालवणातील मुस्लिम समाजानेही निषेध व्यक्त केला. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. यां बाबत पोलिसांना निवेदन देण्यात आले.
हिंदुत्ववादी सरकार, गृहमंत्री यांच्यावर विश्वास
देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. गृहमंत्री यांच्यावर आमचा पुर्ण विश्वास आहे. त्यामुळे देशविरोधी भुमिका घेणाऱ्या प्रवृत्ती विरोधात कठोर कारवाई होईल. असाही विश्वास उपस्थित हिंदू बांधवांपैकी अनेकांनी व्यक्त केला.











