प्रशांत यादव यांच्या हस्ते पेढांबे येथील साठवण टाकीचे उदघाटन व जलपूजन

माखजन l वार्ताहर:

प्रशांत यादव यांची वचनपूर्ती

 

संगमेश्वर तालुक्यातील पेढांबे पंचरत्नवाडी येथील पाण्याची समस्या पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशसरचिटणीस तथा वाशिष्ठी डेअरचे चेअरमन प्रशांत यादव यांनी येथे पाण्याची साठवण टाकी देण्याचे वचन दिले होते.दिलेल्या वचनाची वचनपूर्ती केल्यानंतर साठवण टाकीचे उदघाटन व जलपूजन प्रशांत यादव यांच्या हस्ते पार पडले.यावेळी पंचरत्नवाडी विकास मंडळ, पेढांबे. ता संगमेश्वर ( ग्रामस्थ / मुंबई ) मंडळ यांच्या वतीने प्रशांत यादव यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.तसेच आम्ही नेहमीच प्रशांत यादव यांच्या पाठीशी ठाम उभे राहू असा शब्द ग्रामस्थांनी यावेळी दिला.

यावेळी कांग्रेस पक्षाचे नेते सहदेवजी बेटकर साहेब, शिवसेना ( उबाठा ) विभाग प्रमुख अनिल मोरे, शिवसेना ( उबाठा ) पेढांबे शाखाप्रमुख शातारामजी मते, शाखाप्रमुख किशोरशेठ सुर्वे, वाडी प्रमुख यशवंतजी वेलोंड, गावकर रामचंद्र वेलोंडे, मानकरी दिपक सुर्वे, चिपळूणचे शहर उपाध्यक्ष राकेश दाते, चिपळूणचे युवक तालुकाध्यक्ष रोहन नलावडे, विलास मते, अरुणशेठ सुर्वे, अनिल वेलोंडे, यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.