गावखडी येथील जागृत देवस्थान श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी 

गावखडी / दिनेश पेटकर :  ओम नम शिवाय…ओम नम शिवाय…अशा मंत्रोच्चाराचा जप करीत… अपूर्व उत्साह ,आणि चैतन्यमय वातावरणात रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील जागृत देवस्थान श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री महोत्सवानिमित्त भाविकांनी अलोट गर्दी केल्याने श्रीक्षेत्र गावखडी भक्तीरसात चिंब भिजून गेली आहे.

मंगळवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 पासून गावखडीतील श्रीदेव रामेश्वराचा शिवरात्री महोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात दिमाखात श्रीदेव रामेश्वर देवस्थान, शिवरात्र महोत्सव समिती गावखडीचे सर्व पदाधिकारी व श्रीदेव रामेश्वर देवस्थान विश्वस्त समिती गावखडीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व शिवभक्त, सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा पाच दिवस शिवरात्र महोत्सव मोठ्या भक्तिभावाने मांगल्य, एको प्याने दिमाखात साजरा करण्यात येत आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी अकरा खांबांची व एकवीस पायली तांदळाची महापूजा बांधण्यात येते. हि महापूजा बांधण्यासाठी काही भक्तगण तांदूळ देतात. अशी महापूजा इतरत्र पहावयास मिळणे दुर्मीळ आहे.हि तांदळाने बांधलेली महापूजा हे भक्तगणांचे आकर्षणच असते.गावखडीचे जागृत देवस्थान श्रीदेव रामेश्वर नवसाला पावणारी असल्याने लाखो भाविक येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त नतमस्तक होतात. श्रीदेव रामेश्वरा तुझी कृपा सदा आम्हावरी राहू दे असे साकडे भाविक घालत आहेत.

श्रीदेव रामेश्वर मंदिरात दिव्यांग, वयोवृद्ध माणसे तसेच भाविकांना सुलभ दर्शनासाठी जाता यावे यासाठी सुनियोजन करण्यात आले आहे.

 

फोटो = गावखडी येथील श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्र महोत्सवानिमित्त दर्शनासाठी रिघ लागली आहे.

गावखडी येथील जागृत देवस्थान श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त अकरा खांबांची एकवीस पायली तांदळाची पूजा बांधण्यात आली हे या उत्सवाचे खास आकर्षण असते.

गावखडी श्री देव रामेश्वरात खिचडी वाटप करताना जेष्ठ पत्रकार श्री अनंत पेटकर, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पदमाकर तोडणकर, अन्य मान्यवर

 

छाया = दिनेश पेटकर गावखडी