जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या प्रेरणेतून मुकटीत ८३ वे देहदान 

धुळे : जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रेरणेने ८३ वे मरणोत्तर देहदान नुकतेच झाले. धुळे जिल्ह्यातील मुकटी येथील शेवंताबाई चिंधा कुंभार यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले.

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांच्या स्वस्वरूप संप्रदायातील प्रत्येक भक्त आपल्या जीवनात दान, धर्म, भक्ती , सेवा आणि परोपकार करीत असतो. परंतु “मरावे परी कीर्ती रूपे उरावे” या उक्तीप्रमाणे संप्रदायाच्या हजारो भक्तशिष्यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे. तसे अर्ज त्यांनी संस्थांकडे केला आहे. त्यातील ८३ जणांचे मरणोत्तर देहदान आजअखेर झाले आहे.

धुळे जिल्ह्यातील मुकटी येथील कै. शेवंताबाई चिंधा कुंभार यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे पार्थिव त्यांची मुलगी उषा शांताराम सोनवणे व अन्य नातेवाईकांच्या संमतीने धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने वैकुंठवासी शेवंताबाई चिंधा कुंभार यांना संपूर्ण संप्रदायातर्फे पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

या समाजोपयोगी कार्याला त्यांचे नातेवाईक, उषा शांताराम सोनवणे, शांताराम शिवाजी सोनवणे, दीपक शांताराम सोनवणे ,कैलाश सोनवणे, राधिका कुंभार, पारस कुंभार, सोनाबाई कुंभार, संजय जगदाळे, संगीता जगदाळे व साईबु जगदाळे आदी उपस्थित होते. सर्वांनी हा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केला. समाजातील ललितेश गायकवाड, रतिलाल सोनवणे, हेमलता वाणी, संदीप खैरनार, अशोक वाणी, योगेश चौधरी, विनायक सरोदे, चैतन्य चव्हाण, नारायण तुपते, गुलाब भोये, छोटूराम चौरे, कल्पेश सोनवणे, अनिकेत वाणी व उषाताई चौरे या कार्यकर्त्यांनी या मरणोत्तर देहदान सेवेला मोलाचे सहकार्य केले.