राजापूर : शहरातील गुजराळी येथील मंदार जयंत दातार यांनी आयटी शेक्षातील “हार्डवेअर फॉर हाय परफॉर्मन्स कॉम्प्यूटिंग” या विषयात डॉक्टरेट पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा राजापुरातील सामाजिक संस्था व नागरिकांकडून त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला.
राजापूर शहरातील नागरिकांच्या वतीने नगरसेविका सौ. सुयोगा जठार ,सौ. राधिका गुणे व डॉ. सुयोग परांजपे यांनी दातार यांचा सत्कार केला. तर ‘माय राजापूर’तर्फे जगदीश पवार व संदीप देशपांडे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन दातार यांचा सन्मान केला. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी दातार यांचे आई-वडीलही उपस्थित होते.
मंदार दातार हे शालेय जीवनापासूनच अत्यंत हुशार, साध्या राहणीमानाचे व शांत स्वभावाचे विद्यार्थी म्हणून परिचित आहेत. अत्यंत क्लिष्ट मानल्या जाणाऱ्या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवून राजापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून, भविष्यातही त्यांनी अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
Home महत्वाच्या बातम्या मंदार दातार यांनी “हार्डवेअर फॉर हाय परफॉर्मन्स कॉम्प्यूटिंग” मध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त...










