खेड(प्रतिनिधी) मद्य प्राशन करून शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी तसेच याचा जाब विचारणाऱ्या महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे
राहुल राजाराम खैर रा धामनद गावठाण भापदीवाडी असे त्या गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे तर या प्रकरणी महिला जखमी झाली असून तिने याबाबत तक्रार दाखल केली आहे
राहुल खैर हा नेहमीप्रमाणे. घरात दारू पिवुन येवुन विनाकारण बडबड करुन फिर्यादी यांचा तसेच फिर्यादी यांचे पतीला व सुनेला शिवीगाळी करुन सर्वांना ठार मारण्याची धमकी देत होता. म्हणुन फिर्यादी ह्या आम्हाला विनाकारण शिव्या देवु नकोस असे आरोपीत याला बोलल्यावर त्याचा आरोपीत याला राग आल्याने रागात घरातील चुली जवळील लाकडी दांडका हातात घेवुन फिर्यादी यांचे डोकीत दोन वेळा फटके मारुन दुखापत केली









