मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यावसायिक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वासुदेव ऊर्फ मामा माडये यांच्या ओम गणेश साई मंगल कार्यालयास 25 वर्ष पुर्ण झाली. 2000 साली या वास्तूचे बांधकाम पूर्ण केले राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला होता. बुधवार 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री दिवशी या वास्तूस 25 वर्षे यशस्वी रित्या पूर्ण झाल्याबद्दल श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.
यानिमित्ताने मालवण कुडाळ मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नीलेश राणे यांनी उपस्थित राहून माडये कुटुंबियाना शुभेच्छा दिल्या.
यावेळी हॉलचे मालक मामा माडये, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, आनंद शिरवलकर, दीपक पाटकर, दीपा सावंत, मंगेश माडये, शैलेश माडये, मधुरा माडये, निरज माडये, सोनपरी माडये व अन्य मान्यवर उपस्थित होते.












