न्यू इंग्लिश स्कूल लांजा येथे मराठी भाषा गौरव दिन संपन्न 

लांजा (प्रतिनिधी) न्यू इंग्लिश स्कूल व तु. पुं.शेटये कनिष्ठ महाविद्यालय लांजा येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात पार पडला.

कुसुमाग्रज तथा वि वा शिरवाडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गिरी व्ही. बी., सहाय्यक प्रशासन अधिकारी एस. एल. आंबेरकर, शिक्षण विस्तार अधिकारी विनोद सावंग, न्यू इंग्लिश स्कूल लांजाचे मुख्याध्यापक पाटोळे एस. एस. उप मुख्याध्यापक श्री. आजगावकर व्ही .एम. पर्यवेक्षक वाघाटे एम. ए. सहाय्यक पर्यवेक्षक सरवळे एच. पी. व रविंद्र वासुरकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

‌‌. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शेंडे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना तहसीलदार प्रियांका ढोले यांनी महाराष्ट्राची मातृभाषा मराठी ही समृद्ध असून तिचे जतन व संवर्धन करणे ही आजच्या पिढीची जबाबदारी आहे असे गौरवोद्गार काढले. विनोद सावंग यांनी वि.वा. शिरवाडकर यांच्या साहित्याचा मागोवा घेतला. वाचनामुळे विचार कसे समृद्ध होतात व जीवनाला एक दिशा कशी प्राप्त होते याचे मार्गदर्शन केले.उपमुख्याध्यापक श्री. आजगावकरयांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.मुख्याध्यापक श्री .पाटोळे यांनी ज्या माय मराठीने आपल्यावर सांस्कृतिक छत्र उभे केले, जिने आपणास लहानाचे मोठे केले ,या बहुआयामी जगात स्वतःला सिद्ध करण्याची धमक दिली. आपणास व्यक्त होण्यासाठी शब्दांची प्रखरण केली. याबद्दल आपण नेहमी तिचा आदर केला पाहिजे, असे सांगितले.

कार्यक्रमाचे नियोजन सौ. तेंडुलकर व्ही.एम. यांनी केले.कार्यकमाचे सूत्रसंचालन श्री . बुळे. ई .एस. यांनी तर आभार सौ. कांबळे एम.एम यांनी मानले.