खेडमध्ये दोन ‘वैभवशाली’ विजय; माधवी बुटाला व वैभवी खेडेकर यांचा दणदणीत कौल

खेड (प्रतिनिधी) – खेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या दोन महिला उमेदवारांनी मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवत विशेष लक्ष वेधून घेतले आहे. नगराध्यक्ष पदासाठी माधवी बुटाला यांनी तब्बल 2111 मतांनी विजय मिळवला, तर नगरसेवक पदासाठी वैभवी वैभव खेडेकर यांनी 604 मतांच्या फरकाने दणदणीत यश संपादन केले.
नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत माधवी बुटाला यांना एकूण 5306 मते मिळाली, तर त्यांची प्रतिस्पर्धी सपना कानडे यांना 3195 मते मिळाली. या स्पष्ट कौलामुळे माधवी बुटाला या खेडच्या नगराध्यक्षा म्हणून विराजमान होणार आहेत. त्यांच्या विजयामुळे खेडमध्ये महायुतीच्या नेतृत्वावर जनतेने ठाम विश्वास व्यक्त केला असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, प्रभाग 6अ मधून भाजपच्या वैभवी वैभव खेडेकर यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा 604 मतांनी पराभव करत नगरसेवक पदावर बाजी मारली. त्यांच्या या विजयामुळे भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत असून, तरुण नेतृत्वाला मिळालेला हा मोठा पाठिंबा मानला जात आहे.
या दोन्ही विजयांमुळे खेडच्या राजकारणात महिला नेतृत्वाचा प्रभाव अधोरेखित झाला आहे. विजय जाहीर होताच शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून, ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. “14 वर्षांचा वनवास संपला” या भावनेसोबतच आता खेडच्या विकासासाठी नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
माधवी बुटाला आणि वैभवी खेडेकर यांच्या या दणदणीत विजयाला केवळ वैयक्तिक यश न मानता, तो खेडच्या जनतेने विकास, स्थैर्य आणि महायुतीच्या नेतृत्वावर टाकलेला विश्वासाचा कौल असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

 

खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक निकाल

खेड नगर परिषद मोजणी अपडेट

खेड नगर परिषद जाहीर निकाल

१अ वर्षा तुषार सापटे शिवसेना 811 (विजयी)

१अ चिंतल प्रदीप भंडारे उध्दवसेना 124

१ब पाटणे निकेतन अनंत शिवसेना 808 (विजयी)

१ब ओंकार विलास कुलकर्णी उद्धवसेना 115

२अ निर्मळ मनिषा राजन उध्दवसेना 315

२अ दीप्ती दत्ताराम शिगवण, शिवसेना 380 (विजयी)

२ब मोरे अनिल वसंत अपक्ष 55

२ब जीशान बशीर हमदुले 250 उद्धवसेना

२ ब सहिबोले रहिम युसुफ भाजप 396 (विजयी)

३अ आंब्रे निता केतन शिवसेना 602 (विजय)

३अ दरेकर अश्विनी अशोक 174 राष्ट्रवादी शरद

३ब दरेकर सुनिल बाबुराव शिवसेना 570 (विजयी)

३ ब चंद्रशेखर केरुशेठ पाटणे उद्धवसेना 208

४अ शर्मिला सागर पवार राष्ट्रवादी 257

४अ अंजुम जबीर कुरणे शिवसेना 368 (विजयी)

४ब वजुहुदिन माहमूद परकार राष्ट्रवादी 209

४ब तौसीफ अब्दुल कादिर खोत शिवसेना 412 (विजयी)

५अ यश राकेश खेडेकर शिवसेना 559(विजयी)

५अ बाळाराम बाळू खेडेकर 304

५ ब आरती महेंद्र पवार शिवसेना 629 (विजयी)

५ ब सुनिता सागर खालकर 220 उद्धवसेना

६अ वैभवी वैभव खेडेकर भाजप 711

६अ अपेक्षा अनिल सदरे राष्ट्रवादी 26

६अ रुपाली ओंकार कुलकर्णी उद्धवसेना 81

६ब सतीश गणपत चिकणे शिवसेना 682

६ब सतीश प्रकाश कदम 161

६ ब भूषण सदानंद काणे अपक्ष 27

७अ स्वप्निल पांडुरंग सैतवडेकर शिवसेना 960

७अ प्रणव प्रमोद मापुस्कर राष्ट्रवादी शरद 135

७ ब स्वप्नाली राकेश चव्हाण भाजप 581

७ब कौसर बशीर मुजावर अपक्ष 73

७ब श्रद्धा सागर कवळे अपक्ष 444

८अ प्रेमल श्रीधर चिखले शिवसेना 599

८अ स्वराज विक्रांत गांधी कॉग्रेस 22

८अ ऋषिकेश मनोहर कानडे उध्दवसेना286

८ब संजना संजय कुडाळकर शिवसेना541

८ब सुरभि सुनिल धामणस्कर उध्दवसेना356

९अ रसिका राकेश खेडेकर शिवसेना 632

९अ आरोही संतोष शिंदे उध्दवसेना 337

९ब भूषण शांताराम चिखले शिवसेना 606

९ब सुनिल मनोहर धामणस्कर उध्दवसेना367

१०अ रेश्मा अब्दुल रऊफ खतीब शिवसेना 722
१०अ नाझीमा शाफिल्ला खान कॉंग्रेस 145

१०ब आरीफ फकी महमद फकी मुल्लाजी शिवसेना 683

१० ब दानिश अजीज मणियार अपक्ष54

१०ब बशीर अहमद मुजावर काँग्रेस 131

खेड नगर पालिका
नगराध्यक्ष पद आघाडीवर

माधवी बुटाला (शिंदे सेना)5306
सपना कानडे (उबठा सेना)3195
सीमा जाधव (वंचित)99

माधवी बुटाला विजयी